राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार कोसळणार? सचिन पायलटसह ३० पेक्षा जास्त आमदारांचा भाजपात प्रवेश होऊ शकतो

Sachin Pilot

नवी दिल्ली : मध्य प्रदेशनंतर राजस्थानमधील काँग्रेस सरकारही कोसळण्याच्या घटकेवर आली आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील संघर्ष वाढतच चालला आहे. नुकतंच सचिन पायलट यांनी गहलोत सरकार अल्पमतात आल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचे ३० आमदार आणि काही अपक्ष आमदारांचा मला पाठिंबा असल्याचे पायलट यांनी म्हटले आहे. त्यामुळे गहलोत सरकार अल्पमतात आले आहे.

दुसरीकडे republicworld.com वृत्तात दिलेल्या माहिती नुसार येणाऱ्या २४ तासात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत सचिन पायलट आपल्या समर्थक आमदारांसह भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांद्वारे मिळाली आहे असे म्हंटले जात आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER