काँग्रेसची घसरण सुरूच, पुडुच्चेरीत सरकार कोसळले

पुडुच्चेरी : पुडुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातील काँग्रेसचे सरकार कोसळले. सरकारला आज बहुमत सिद्ध करायचे होते. त्याआधी काल (रविवारी) काँग्रेसच्या नेतृत्वातील सत्तारुढ आघाडीतील आणखी दोन आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी (V. Narayanaswamy) यांचं सरकार कोळसळणार हे निश्चित झाले होते.

आज सोमवारी शक्ती परीक्षणात सरकारला बहुमत सिद्ध करता आले नाही. सरकार कोसळल्यानंतर व्ही. नारायणस्वामी यांनी प्रतिक्रिया दिली, पडुच्चेरीत राजकीय वेश्याव्यवसाय सुरू आहे.

काँग्रेस आणि द्रमुकच्या प्रत्येकी एक आमदाराच्या राजीनाम्याने ३३ सदस्य असलेल्या विधानसभेत सत्तारुढ काँग्रेस आघाडीचे संख्याबळ ११ पर्यंत घसरले आहे. विरोधी आघाडीकडे १४ सदस्य आहेत. सात जागा रिक्त आहेत. यामुळे नारायणस्वामी यांच्या सरकारवर बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER