आगामी विधानसभेसाठी काँग्रेसचा पुन्हा स्वबळाचा नारा; महाविकास आघाडीवर प्रश्नचिन्ह

Congress for assembly election

मुंबई : २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर (assembly election) शिवसेनेने भाजपशी (BJP) फारकत घेत राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसला (Congress) सोबत घेऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. स्थानिक पातळीवरही महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) एकत्रित निवडणूक लढवल्या आहेत; पण आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पुन्हा एकदा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नाना पटोले यांनी पक्षसंघटनेच्या मजबूत बांधणीसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

आज नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटक महाराष्ट्र शाखेच्या राज्यस्तरीय कार्यकारिणीची ऑनलाईन बैठक झाली. यावेळी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना ‘आगामी विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार, असा निर्धार पटोले यांनी बोलून दाखवला’, असे वृत्त दिव्य मराठीने दिले आहे. ‘मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर कामगार कायदे रद्द केले आहेत.

सर्व कायदे आता मालकाच्या बाजूने गेले असून कामगारांना देशोधडीला लावण्याचे काम मोदी सरकारने केले आहे; पण हे कामगारविरोधी कायदे राज्यात लागू होऊ देणार नाही, असंही नाना पटोले यांनी स्पष्ट केलं. तसंच, कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी काँग्रेस पक्ष नेहमीच लढा देत आला आहे. सत्तेत असताना कामगार हिताचे कायदे बनवले होते. सध्या केंद्रात असलेले सरकार शेतकरी, कामगारांच्या विरोधात कायदे तयार करत आहे. काँग्रेस या विरोधात लढा देत राहील, असंही पटोले म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button