काँग्रेसची उद्या शेतकरी बचाव रॅली

Congress

कोल्हापूर : शेतकरीविरोधी कायद्यांना विरोध करण्यासाठी उद्या, गुरुवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यात सहा ठिकाणी ‘शेतकरी बचाव रॅली’ व्हर्चुअल सभेचे आयोजन केले आहे. या रॅलीमध्ये सहभागी शेतकऱ्यांशी काँग्रेस  अध्यक्ष सोनिया गांधी ह्या ऑनलाईन संवाद साधणार आहेत.

कोल्हापुरात काँग्रेस कमिटी कार्यालयात सायंकाळी ४ वाजता होणाऱ्या सभेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री सतेज पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम मार्गदर्शन करणार आहेत. केंद्र सरकारने तीन शेतकरी विरोधी कायदे आणले आहेत. या कायद्याविरोधात काँग्रेस पक्ष देशभर संघर्ष करत आहे. कृषी आणि कामगार कायद्यांमुळे देशातील शेतकरी, कामगार उद्ध्वस्त होणार असून त्यांना उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचा हा डाव आहे.

या विरोधात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने देशव्यापी लढाई सुरू केली आहे. राज्यातील सहा वेगवेगळ्या ठिकाणांहून काँग्रेस नेते राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. जिल्ह्यातील शेतकरी त्यांच्या गावातून ऑनलाईन पद्धतीने यामध्ये सहभागी होणार असल्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष  सतेज पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे. कोल्हापुरातील सभेला आ.पी. एन. पाटील, आ. ऋतुराज पाटील, आ. राजू बाबा आवळे, आ. चंद्रकांत जाधव, काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER