काँग्रेसला सेक्युलरीजम शिकवण्याची गरज नाही, यशोमती ठाकूर यांनी शिवसेनेला सुनावले

Yashomati Thakur - CM Uddhav Thackeray

अमरावती : औरंगाबाद (Aurangabad) शहराच्या नामकरण मुद्यावरून शिवसेना (Shiv Sena) आणि काँग्रेसमध्ये आता शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. मंत्री व काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी शिवसेनेला बजावले – काँग्रेसला (Congress) सेक्युलरीजम शिकवण्याची गरज नाही.

शिवसेना नामांतराच्या बाजूने आहे व नामांतराला विरोध करत असल्याबद्दल काँग्रेसला डिवचते आहे. औरंगाबादचे नामांतर केल्याने मुसलमान समाज म्हणजे अल्पसंख्याक नाराज होतील व मत बँकेवर परिणाम होईल, अशी भीती काँग्रेसला वाटते, असा टोमणा शिवसेनेने मारला.

यावर काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष व महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी शिवसेनेला बजावले – आम्ही काँग्रेस म्हणून महाविकास आघाडीच्या ‘कॉमन मिनीमम प्रोग्राम’मध्ये असलेल्या विषयावर काम करण्यास कटिबद्ध आहोत. आपली मतं वैयक्तिक आहेत की पक्ष म्हणून यांचा खुलासा झाल्यानंतर पुढचे बोलता येतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER