काँग्रेसला विरोधक लागत नाही ; निलेश राणेंचा टोला

Nilesh Rane-Balasaheb Thorat

मुंबई : मुंबई काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड करण्यात आली असली तरी त्यांच्या अधिकारांना कात्री लावण्यात आली आहे. मुंबई काँग्रेसची निवड समिती आणि स्ट्रॅटेजी समितीचे  अध्यक्षपद प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्याकडे देण्यात आले आहे.

त्यावरून भाजप (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी काँग्रेसला जोरदार टोला लगावला. काँग्रेस पक्ष हा खो-खोसारखा आहे. कधी कोणाला खो देतील आणि कधी कोणामुळे कोण बाद होईल हे कोणालाच माहीत नसते. काँग्रेसमध्ये एकदा कोणाला पद मिळालं तर तो बाद कसा होईल याकरिता एक मोठा गट तयार असतो. काँग्रेस पक्षाला विरोधक लागत नाही, असे ट्विट निलेश राणे यांनी केले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER