नारायण राणे आणि ‘एमआयएमशी हातमिळवणी नाही : अशोक चव्हाण

ashok-chavan

मुंबई :- माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी भाजप पासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला . त्यानंतर लगेच त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करण्याचे ठरवले आहे. मात्र या कोकणात होऊ घातलेल्या त्यांच्या युतीला काँग्रेसने विरोध केला आहे. यासोबतच भारिप-बहुजन महासंघाचे संस्थापक अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आघाडी करून त्यांना काँग्रेस महाआघाडीत सहभागी करण्यासाठी चर्चा सुरू आहे; मात्र त्यांच्यासोबत एमआयएम येत असेल, तर चालणार नाही, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे .जनसंघर्ष यात्रेच्या चौथ्या टप्प्यात ते अकोल्यात बोलत होते.

ही बातमी पण वाचा : प्रस्थापितांच्या निष्क्रियतेमुळे ओबीसी संघटनांच्या नेत्यांमध्ये नाराजी

नारायण राणे यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत भाजपा पक्षासोबत जाण्याचे ठरविले होते. त्या बदल्यात राणे यांना राज्यसभेची खासदारकी मिळाली. शिवसेना लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढली तर राणेंसोबत युती करण्याची भाजपची रणनीती आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपतर्फे शिवसेनेची मनधरणी करणे सुरु आहे . त्यामुळे राणेंची राजकीय कोंडी झाली आहे. यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीशी युती करण्याचा निर्णय घेतल्याची टीका चव्हाण यांनी केली आहे . राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राणेंच्या कणकवली येथील घरी भेट दिली. त्यानंतर राष्ट्रवादी व राणे यांच्या आघाडी संदर्भात चर्चा रंगल्या. कोकणातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा राणेंना पुन्हा सोबत घेण्यास विरोध असल्याचे चव्हाण म्हणाले.

ही बातमी पण वाचा : राहुल आणि सोनिया गांधी यांना हात लावला तर जनता रस्त्यावर येईल : अशोक चव्हाण

दरम्यान भाजपाला पराभूत करण्यासाठी समविचारी पक्षांना एकत्र घेऊन निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट करत त्यांनी महाआघाडीत सहभागी होण्यासाठी शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यासह प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतही चर्चा सुरू असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : नारायण राणे संपले नाहीत, हे पवारांनाही ठाऊक आहे! – नितेश राणे