दिल्ली हिंसाचाराला अमित शहाच जबाबदार; राजीनामा देण्याची काँग्रेसकडून मागणी

Randeep Surjewala - Delhi Violence - Amit Shah

नवी दिल्ली :- प्रजासत्ताकदिनी राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली (Delhi Farmers Tractor Rally) दरम्यान झालेल्या हिंसेवरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या जात आहे. शेतकरी आंदोलनाच्या (Farmers Protest) आड दिल्लीत हिंसा घडवण्यासाठी सुनियोजित कट आखण्यात आला होता. त्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच (Amit Shah) जबाबदार असून त्यांनी तत्काळ गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसने (Congress) उचलून धरली आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. शेतकरी आंदोलनाच्या आड सुनियोजित हिंसा भडकवण्यात आली. अमित शहा यांच्या आदेशावरूनच दिल्ली पोलिसांकडून शेतकरी आंदोलनातील शेतकरी नेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करत आहे. दिल्ली पोलिसांच्या या कृतीतून भाजपा सरकारचाच हा डाव असल्याचे सिद्ध होते. गृहमंत्री अमित शहा यांना दिल्लीची परिस्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयश आलं. त्यामुळे मोदी सरकारने अमित शहांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ता रणदीपसिंह सुरजेवाला यांनी केली.

दीप सिद्धूला (Deep Sidhu) अटक का नाही?
दीप सिद्धू आणि त्यांचे सहकारी लाल किल्ल्यात दाखल झाले. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांसोबतचे फोटो याच सिद्धूने सार्वजनिक केले आहेत. लाल किल्ल्यावर झेंडा फडकावून शेतकऱ्यांना भडकावणाऱ्या सिद्धूला अटक का करण्यात आली नाही? शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचंच हे षडयंत्र होतं हे यावरून सिद्ध झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

ही बातमी पण वाचा : काँग्रेसकडून अंबानींचा तिरस्कार की अंबानींना पुरस्कार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER