काँग्रेसचे ठरले, मुंबई मनपा स्वबळावरच लढणार – भाई जगताप

Municipal Elections Will Be Fought Alone, Big Announcement Of The Congress

मुंबई :- मुंबई महापालिका निवडणूक (Mumbai Municipal Corporation) काँग्रेस स्वबळावर लढणार, अशी घोषणा काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी केली आहे. या संदर्भात उल्लेखनीय आहे की, मुंबईच्या काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबरोबरच याबाबत मागणीवजा घोषणा केली होती. एका राज्याएवढे बजेट असलेल्या मुंबई महापालिकेची निवडणूक २०२२ मध्ये होणार आहे. या निवडणुकीसाठी राज्यातील सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यात महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांची सत्ता असताना काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळाचा नारा दिल्याने महाविकास आघाडीच्या राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता आहे. (The Municipal Elections Will Be Fought Alone, Big Announcement Of The Congress)

पत्रकारांशी  बोलताना भाई जगताप म्हणालेत, आम्ही वॉर्ड पातळीवर १०० दिवसांचा ‘रिव्ह्यू प्लॅन’ आखला आहे. वॉर्डनिहाय आढावा घेऊ. मात्र, मनपा स्वबळावर लढण्याचा आमचा निर्णय ठाम आहे. मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना निःशुल्क पाणी देण्याची मागणीही काँग्रेसने केली आहे.

यासाठी मनपाच्या तिजोरीवर १६८ कोटींचा बोजा पडणार असला तरी गरिबांना निःशुल्क पाणी देणे आवश्यक आहे. पाणी माफिया मोठ्या प्रमाणात पाणीचोरी करतात, हे पाणी गोरगरिबांना मिळायला हवे.  देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत झोपडपट्टीवासीयांची घरे नियमित करण्याच्या घोषणा केल्या; पण पुढे काय झाले? असा प्रश्नही भाई जगतापांनी केला.

ही बातमी पण वाचा : काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण? काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी जाणून घेतले पवारांचे मत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER