काँग्रेस नगरसेवकाकडून आरोग्य निरीक्षकास माराहाण : व्हिडीओ व्हायरल

Congress corporator beats health inspector Video goes viral

कोल्हापूर : कसबा बावड्यातील काँग्रेसचा नगरसेवक श्रावण फडतारे याने महापालिकेचे आरोग्य निरीक्षक नंदू पाटील यांना आर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत माराहाण केेल्याची घटना घडली. प्रभागातील स्वच्छतेच्या करणावरुन ही वादावादी झाल्याचे समजते. दरम्यान, वरिष्ठ अधिकारी आणि काही नगरसेवकांनी मध्यस्थी करत प्रकरण मिटविले. कोरोना महामारीत आरोग्य विभाग रात्रदिवस राबत आहे. अशास्थितीत नगरसेवकाने माराहाण केल्याच्या घटनेने आरोग्य कर्मचाऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. माराहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयात व्हायरल होत आहे.

कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. नगरसेवकांकडून महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ माराहाण करण्याचे घटना वरचेवर घडत असतात. पाण्यात राहून वैर नको म्हणून भितीने कर्मचारी तक्रार करत नाहीत. प्रभागातील स्वच्छतेच्या कारणावरुन श्रावण फडतारे याने नंदू पाटील यास जाब विचारला. कोरोना महामारीमुळे वर्कलोड असल्याने कर्मचारी कमी असल्याचे कारण पाटील याने सांगितले. यानंतर दोघांत वादावादी झाली. फडतारे याने शिवीगाळ करत पाटील याच्या अंगावर धावूून गेला. याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. दरम्यान, हे प्रकरण मिटविण्यात आले. मात्र याबाबत महापालिका कर्ममचाऱ्यात संताप आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER