काँग्रेसने निकालाआधीच मान्य केला पराभव? निवडणूक चर्चांमध्ये भाग घेणार नाही

Maharashtra Today

नवी दिल्ली : विधानसभांच्या निकालांबाबत वृतवाहिन्यांवर होणाऱ्या चर्चांमध्ये काँग्रेस (Congress)आपले प्रतिनिधी पाठवणार नाही. देशातील कोरोना परिस्थितीमुळे काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे!

कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट केले आहे, की, देशातील कोरोना संसर्गाची बिकट परिस्थिती पाहता, कॉंग्रेस पक्ष वृत्तवाहिन्यांवरील निकालांच्या चर्चांमध्ये सहभागी होणार नाही!

कोरोनाचा सामना करण्यात सरकार अपयशी
काँग्रेसने म्हटले आहे की, भारत एका अभुतपूर्व संकटाचा सामना करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार कोरोनाचा सामना करण्यात अपयशी ठरत आहे. याबाबत सरकारला जाब विचारण्याऐवजी, वृत्तवाहिन्यांवर चर्चा करणे आम्हाला योग्य वाटत नाही, त्यामुळे तेथून माघार घेण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. \

सुरजेवाला यांनी म्हटले की, माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रतिक्रिया विचारल्यास त्या उपलब्ध करून दिल्या जातील. आम्ही जिंकू शकतो किंवा पराभूतही होऊ शकतो. परंतु लोकांना ऑक्सिजन, रुग्णालये, बेड, औषध, वेंटिलेटर आदींची जास्त गरज आहे. आमचे कर्तव्य आहे की, आम्ही त्यांची मदत करावी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button