काँग्रेसचा उमेदवार म्हणाला – कुणाला कधी पाडायचे हे जनतेला आहे ठाऊक; आणि मंच कोसळला !

Congress candidate from Jale assembly seat Mashkoor Ahmad Usmani

पाटणा : बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील जाले विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार मशकूर अहमद उस्मानी (Mashkoor Ahmad Usmani) भाषण करत होते. ते म्हणालेत, निवडणुकीत जनतेला चांगले सरकार निवडण्याची संधी मिळते. लोकशाहीत सगळ्यांना ठाऊक आहे की कुणाला कधी उचलायचे आणि कुणाला कधी पाडायचे.

आणि त्यांचे वाक्य संपताच मंच कोसळला! याचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला आहे. उस्मानी यांच्यासह मंचावरचे सर्व लोक खाली पडले. मशकूर अहमद उस्मानी हे बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील जाले विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत. याआधी ते उत्तरप्रदेशमधील अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी संघटन प्रमुख होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER