बलात्काराच्या आरोपीला काँग्रेसची उमेदवारी, विरोध करणाऱ्या महिला नेत्याला मारहाण

Congress candidate

देवरिया : उत्तर प्रदेशमधील देवरिया येथे होत असलेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने बलात्कारात आरोपीला तिकीट दिल्याचा विरोध करणाऱ्या तारा यादव या पक्षाच्या स्थानिक नेत्याला कार्यकर्त्यांनी मारहाण केली.

या पिटनिवडणुकीसाठी काँग्रेसने मुकुंद भास्कर यांना उमेदवारी दिली. मुकुंद यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे. अशा व्यक्तीला पक्षाने उमेदवारी दिल्यामुळे आम्ही प्रश्न उपस्थित केला होता म्हणून कार्यकर्त्यांनी मला मारहाण केली असा आरोप तारा यादव यांनी केला.

प्रियंका गांधी कारवाई करणार ?

आमच्या पक्षाच्या नेत्या हाथरस प्रकरणातील पीडितेला न्याय मिळावा म्हणून लढाई लढत आहेत. त्याचवेळी एका बलात्कारी व्यक्तीला पक्षाने निवडणुकीचे तिकीट दिले. पक्षाचा हा निर्णय पक्षाची प्रतिमा मलीन करेल. या प्रकरणी प्रियंका गांधी काय कारवाई करतात याची मी वाट पाहते आहे, असे तारा म्हणाल्यात.

दोन कार्यकर्ते निलंबित

तारा यादव यांना झालेल्या मारहाण प्रकरणी चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश काँग्रेसने एक कमिटी स्थापन केली आहे. ही कमिटी तीन दिवसांत अहवाल सादर करण्यार आहे. दरम्यान, याप्रकरणी दोन कार्यकर्त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

महिला आयोगानेही घेतली दखल

महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे. २५ लोक एका महिला नेत्याला मारहाण करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. राजकारणातील लोक महिला कार्यकर्त्यांसोबत गुंडांप्रमाणे व्यवहार करत आहेत. अशा लोकांना शिक्षा मिळायला हवी, असे महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा म्हणाल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER