परमबीर सिंह यांच्या आरोपांची काँग्रेसला धग : राशीद अल्वी प्रवक्ते नाहीत, सावंतांचे ट्विट

Maharashtra Today

मुंबई : राज्यात सध्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh)यांनी गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या ‘१०० कोटींच्या टार्गेट’च्या (100 crore target) आरोपांमुळे खळबळ माजली आहे. याची झळ आता काँग्रेसलाही बसते आहे. काँग्रेस नेते राशीद अल्वी (Rashid Alvi) यांनी अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला पाहिजे, असे मत व्यक्त केले. काँग्रेसला या झेंगटात पडायचे नसल्याने पक्षचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी लगेच खुलासा केला – राशीद अल्वी प्रवक्ते नाहीत.

या प्रकरणात काँग्रेसने सावध भूमिका घेतली असताना काँग्रेस नेते राशीद अल्वी यांनी अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला पाहिजे असे स्पष्ट मत व्यक्त केले – “परमबीर सिंह यांनी पदावर असताना काहीही वक्तव्य केले नाही, कोणतीही तक्रार केली नाही. त्याचवेळी करायला हवे होते. जर ते पोलीस आयुक्तपदी कायम असते तर कदाचित त्यांनी तक्रारच केली नसती. त्यांचा तपास व्हायला हवा. यासोबतच गृहमंत्र्यांचीही चौकशी झाली पाहिजे. यामध्ये एक नाही तर तीन-चार पोलीस अधिकारी सहभागी आहेत. त्यामुळे जोपर्यंत तपास सुरु आहे तोपर्यंत गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असा माझा सल्ला आहे. तपासाअंती गृहमंत्री निर्दोष असतील तर पुन्हा शपथ घेऊ शकतात.”

यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये असणाऱ्या काँग्रेसच्या भूमिकेवरुन चर्चा सुरू व काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट करत भूमिका स्पष्ट केली – “अनेकजण कोणत्याही विषयावर आपलं मत व्यक्त करु शकतात. हे त्यांचे वैयक्तिक मत म्हणून ग्राह्य धरले पाहिजे. फक्त प्रदेशाध्यक्ष आणि प्रवक्त्यांचे वक्तव्य ही पक्षाची भूमिका म्हणून पाहिले पाहिजे. राशीद अल्वी काँग्रेसचे अधिकृत प्रवक्ते नाहीत.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER