बाळासाहेब थोरातांनी संजय राऊत यांना विचारला थेट प्रश्न

Balasaheb Thorat & Sanjay Raut

मुंबई : औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर (Sambhajinagar) असे करावे , या शिवसेनेने (Shivsena) केलेल्या मागणीला आघाडीचा घटक असलेल्या काँग्रेसने मात्र विरोध केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाज महाराज आमचे दैवत आहेत.. शहराचे नाव बदलल्याने सामान्यांच्या जीवनात काही फरक पडणार आहे का? असा सवाल उपस्थित करत ज्यावेळी आपण महाविकास आघाडी स्थापन केलेली आहे त्यावेळी सर्वसामान्य माणूस केंद्रभूत मानत त्याच्यासाठी काय चांगलं करता येईल हे काम आपल्याला करायचे आहे,’ असं उत्तर बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी संजय राऊतांना (Sanjay Raut) दिलं आहे.

‘शहरांची नावे बदलल्याने सर्वसामान्य माणसाच्या जीवनात काय बदल होणार आहे? या उलट यामुळे जो सामाजिक विद्वेष निर्माण होईल तो फायदेशीर ठरणार नाही, ते उद्दिष्ट आपले नाही. आपण याबाबत चर्चा करू, असे ही थोरातांनी म्हटलं आहे.

उत्तर प्रदेशात काही शहरांची नावे बदलली गेली, मात्र यामुळे काही फरक पडला का? निवडणूक आली की लोकांच्या भावनेच्या मुद्यावर राजकारण करायचे काम काहीजण करत असल्याची टीका भाजपाचे नाव न घेता बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

ही बातमी पण वाचा : शिवसेनेची भूमिका स्पष्ट, बाळासाहेबांनी औरंगाबादचे संभाजीनगर केव्हाच केले – संजय राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER