लेटरबॉम्बवरून काँग्रेस नाराज; देशमुखांच्या राजीनाम्यासंबंधी एच. के. पाटील यांचे निवेदन

HK Patil - Maharastra Today

मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांवर काँग्रेस नाराज असल्याचे उघड झाले आहे. काँग्रेसचे राज्य प्रभारी एच.  के.  पाटील यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून देशमुखांच्या राजीनाम्याबाबत तत्काळ निर्णय घेण्याचे संकेत दिले आहे. विरोधकांकडून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राशीद अल्वी यांनीदेखील राजीनाम्याचा सल्ला दिला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी मात्र ही त्यांची वैयक्तिक भूमिका असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यातच एच. के. पाटील यांनी हे निवेदन दिलं आहे. महाराष्ट्रातील स्थितीविषयी विधिमंडळ नेता, वरिष्ठ मंत्री आणि प्रदेशाध्यक्षांसोबत मी चर्चा केली. माजी पोलीस आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राबाबत कोअर कमिटीचे सदस्य असणारे बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.

अनिल देशमुख यांनी निवेदन प्रसिद्ध करत मुख्यमंत्र्यांना योग्य प्रकारे तपास करण्याची विनंती केली आहे. या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आधीच प्रसारमाध्यमांशी चर्चा करत ‘आम्ही राजीनाम्यावरही चर्चा करू. जे पर्याय असतील त्यावर चर्चा होईल, राजीनामादेखील एक पर्याय आहे’ असं सांगितलं असल्याचं निवेदनात म्हटलं आहे. तसेच राष्ट्रवादीने चर्चा करून निर्णय घेऊ, असं सांगितलं असून अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेणार असल्याचं स्प्ष्ट केलं आहे. दरम्यान महाविकास आघाडीच्या कोअर ग्रुपचे सदस्य आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांना भेटणार असून चर्चा करणार आहे. मुख्यमंत्री लवकरात लवकर यासंबंधी अंतिम निर्णय घेतील, असे म्हणत एकप्रकारे देशमुखांच्या राजीनाम्याबाबत तत्काळ निर्णय घेण्याचे म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER