
मुंबई : राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाच फायदा झाला. शिवसेनेच्या (Shivsena) हाती काहीच लागलेले नाही. भाजपालाही एकच जागा मिळाली. शिवसेनेचे कट्टर विरोधक आणि भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनीही ट्विट करून भाजपाचा पराभव मान्य केला.
म्हणालेत, ठीक आहे आम्ही कमी पडलो. पण, मुख्यमंत्री असलेल्या पक्षाला भोपळाही फोडता आली नाही. मित्रपक्षांनीच शिवसेनेच्या मृत्यूचा सापळा रचला आहे. बाकी मैदानात परत भेटू. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेकडून केवळ अमरावतीत उमेदवार उभा करण्यात आला होता. उर्वरित जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार होते. हे सर्व उमेदवार निवडून आले; मात्र, अमरावतीत शिवसेनेचे श्रीकांत देशपांडे यांचा पराभव झाला.
गृहमंत्री अनिल देशमुख यांचे नातेवाईक आणि अपक्ष निवडणूक किरण सरनाईक यांच्याकडून श्रीकांत देशपांडे यांचा पराभव झाला. या निवडणुकीत शिवसेनेचा एकही उमेदवार निवडून आला नाही. विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांना राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांच्या नातेवाइकाने हरवले. यावरून भाजपाचे नेते शिवसेनेला डिचवत आहेत.
ठीक आहे आम्ही कमी पडलो!
पण ज्यांचा मुख्यमंत्री त्यांना भोपळा..
मित्र पक्षानीच रचला मृत्यूचा सापळा..
बाकी मैदानात परत भेटूच !!— nitesh rane (@NiteshNRane) December 4, 2020
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला