सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षपादावरून हकालपट्टी; गोविंदसिंह राजस्थान कॉंग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष

Congress
  • गोविंदसिंह राजस्थान कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष.
  • राजस्थान सरकार पाच वर्षे टिकेल.
  • पायलट यांच्यासह तीन समर्थकांना मंत्रिपदावरून हटवले.
  • कुठल्याही क्षणी सचिन पायलट पत्रकारांशी संवाद साधणार.
  • कॉंग्रेसच्या कारवाईवर सचिन पायलट लवकरच भूमिका मांडणार.

नवी दिल्ली : बंडखोरी करत दिल्लीत आलेल्या सचिन पायलट (Sachin Pilot) यांची अखेर काँग्रेसने (Congress) उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी केली आहे. तसेच त्यांना पाठिंबा देणाऱ्या इतर मंत्र्यांचेही मंत्रिपद काढून घेण्यात आले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांनी पत्रकार परिषद घेत या निर्णयाची घोषणा केली. तसेच काँग्रेसच्या पक्षांतर्गत नव्या नियुक्त्यांचीही माहिती दिली.

सुरजेवाला म्हणाले, “सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि विश्वेंदर सिंह आणि रमेश मिना यांना मंत्रिपदावरुन तात्काळ काढलं जात आहे. राजस्थान काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदावर राजस्थानचे शिक्षण मंत्री गोविंदसिंह यांची नियुक्ती करण्यात येत आहे. ते शेतकरी पुत्र असून त्यांनी शेतीच्या मशागतीसोबतच काँग्रेसचीदेखील मशागत केली. ते जिल्हाध्यक्ष पदावरुन इथपर्यंत आले आहेत.” अशी घोषणा सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत केली.

यातसेच, काँग्रेसचं सरकार व्यक्तीवर अवलंबून नाही, तर मुल्यांवर टिकलेलं असल्याचं सांगत हे सरकार 5 वर्षे टिकेल असंही सांगितलं.

दरम्यान, सचिन पायलट याच्यावरील कारवाईला ते लवकरच उत्तर देतील त्यांची पुढची भूमिका मांडतील असे सांगण्यात येत आहे. कुठल्याही क्षणी पायलट पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडतील अशी माहिती वृत्तवाहीनीने दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER