खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या ‘सरसेनापती हंबीरराव’च्या टीमला सदिच्छा

सरसेनापती हंबीरराव

लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांच्या आगामी बहुचर्चित ‘सरसेनापती हंबीरराव’ या भव्य ऐतिहासिक चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे निर्माते संदीप मोहिते पाटील, धर्मेंद्र बोरा, सौजन्य निकम यांनी नुकतीच छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) वंशज खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (Chhatrapati Udayan Raje Bhosale) यांची भेट घेतली. या प्रसंगी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची पूर्णाकृती मूर्ति उर्विता प्रॉडक्शन्सच्या वतीने भेट देण्यात आली. प्रवीण तरडे सरसेनापती हंबीररावांची भूमिका साकारीत आहेत.

या भेटीबद्दल आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर खासदार उदयनराजे भोसले यांनी माहिती दिली असून त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, “सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावर आधारित तयार होत असलेल्या “सरसेनापती हंबीरराव” या बिग बजेट चित्रपटाचे निर्मात्यांनी माझी भेट घेऊन चित्रपटाबद्दलची संपूर्ण माहिती दिली. स्वराज्याचा इतिहास मोठ्या पडद्यावर येत असताना आजच्या पिढीला स्वराज्याच्या शिलेदारांची महती समजत आहे याचा मला मनस्वी आनंद होत आहे. सरसेनापती हंबीरराव (Sarsenapati Hambirrao) चित्रपट टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.’

या विषयी बोलताना चित्रपटाचे निर्माते संदीप मोहिते पाटील म्हणाले की, उदयनराजे भोसले यांनी सरसेनापती हंबीरराव’ हा आपला चित्रपट आहे त्यामुळे त्याचे प्रमोशन अगदी हक्काने मीच करणार हे आवर्जून सांगितल्याने आमच्या संपूर्ण टीमला खऱ्या अर्थाने दहा हत्तींचे बळ मिळाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER