खडसे ज्या पक्षात जात आहेत, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा – चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil & Eknath Khadse

मुंबई :- एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पक्ष सोडू नये यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र आमचे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. नाथाभाऊ ज्या पक्षात जातील तेथे त्यांनी जनतेचे प्रश्न मांडावेत, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांनी व्यक्त केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील यांनी खडसेंच्या राजीनाम्याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

पाटील म्हणाले, खडसे यांचा राजीनामा माझ्याकडे आला आहे. खडसे यांनी पक्षात राहावे अशीच आम्हा सर्वांची भूमिका होती. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. नाथाभाऊ रागावतील पण ही स्टेप घेतील असं वाटलं नव्हतं, त्यांनी राजीनामा दिला हे कटू सत्य, त्यांनी नेतृत्व करावं ही इच्छा होती, ज्या पक्षात जात आहेत, तिथे चांगलं काम करावं, यासाठी शुभेच्छा. आज सकाळीही मी त्यांच्याशी संपर्क साधला होता. पण आमचे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. ते ज्या पक्षात जातील, तेथे त्यांनी चांगले काम करावे, अशा शुभेच्छा पाटील यांनी दिल्या. खडसे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे त्याबाबत मी काही बोलणार नाही, असेही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

नाथाभाऊ आणि आमच्यात संवाद सुरु होता. आज सकाळी जयंत पाटलांचं ट्विट त्यांनी रिट्वीट केलं आणि मग डिलीट केलं तोपर्यंत आम्हाला आशा होती की ते सोडून जाणार नाही. त्या क्षणापर्यंत दोर तुटलेला नाही असं आम्हाला वाटत होतं. देवेंद्र फडणवीसांविरोधात त्यांचे जे काही आरोप असतील त्याबद्दल त्यांनी त्यांची बाजू मांडलेली आहे आणि फडणवीसांनीही त्यावर स्पष्टीकरण दिलंय. परंतू या मुद्द्यावर आता चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. एखाद्या घटनेविषयी प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात. खडसे यांना आमच्या पक्षात एक स्थान होतं. त्यांना राजीनामा देण्याची गरज नव्हती. पण आता यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटलांनी खडसेंच्या राजीनाम्यावर दिली.

खडसे यांनी पक्ष सोडण्यापूर्वी आपण त्यांची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला. नाथाभाऊ यांचा राजीनामा माझ्या हातावर ठेवण्यात आला. आम्हाला असं वाटलं होतं की ते चिडतील पण पक्षातच राहतील. आम्ही सगळे प्रयत्न केले. पण सगळे प्रयत्न यशस्वी होतात, असं नाही. आम्ही त्यांना वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी त्यांचं मत तयार केलं असावं. माझा आणि नाथाभाऊंचा संवाद चांगला होता. त्यामुळे माझ्यावर त्यांच्याशी बोलण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र त्यांनी आमचं म्हणणं मान्य केलं नाही. असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER