राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून सोलापूर येथील शिक्षक रणजितसिंह डिसले यांचे अभिनंदन

Governor Bhagat Singh Koshyari - Ranjitsinh Disale

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झालेले सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) यांचे अभिनंदन केले आहे.

सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील विद्यार्थिप्रिय शिक्षक रणजितसिंह डिसले यांना लंडनस्थित वर्की फाउंडेशनच्या विद्यमाने दिला जाणारा एक दशलक्ष डॉलर रक्कम असलेला ग्लोबल टीचर पुरस्कार (Global Teacher Prize 2020) जाहीर झाल्याबद्दल डिसले यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.

नावीन्यपूर्ण संकल्पना तसेच तंत्रज्ञानाची मदत घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्याचे डिसले यांचे कार्य अनुकरणीय व कौतुकास्पद आहे, असे राज्यपालांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER