राज ठाकरेंकडून रजनीकांत यांना शुभेच्छा

raj thackeray - rajnikanth - Maharastra Today

मुंबई :-  बॉलिवूड आणि दाक्षिणात्य मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाने कोट्यवधी रसिक प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या रजनीकांत यांना ५१ वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत (Rajnikant) यांचं अभिनंदन केलं आहे.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्विट करून रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. राज ठाकरे त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, रजनीकांतना काहीच अशक्य नाही, असं त्यांच्या चाहत्यांना वाटणं योग्यच, पण अशा आशयाचे हलकेफुलके विनोद त्यांचे सिनेमे न पाहिलेला पण हिरिरीने एकमेकांना पाठवतो. ज्या अभिनेत्याचं देऊळ उभारलं जाऊन, रजनीकांत ह्या व्यक्तीला जवळपास देवाच्या जवळ नेऊन त्यांचा एक पंथ निर्माण होतो, आणि इतकं असताना हाच अभिनेता अपूर्व प्रसिद्धीच्या झोतातदेखील सिनेमातील पात्राची झूल उतरवून सामान्य माणसासारखा जगू शकतो, असा हा एकमेवाद्वितीय सुपरस्टार. रजनीकांत ह्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर  झाला. कर्मभूमीचं ऋण अपार मानणाऱ्या या अभिनेत्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनापासून अभिनंदन, अशा शब्दांमध्ये राज ठाकरेंनी रजनीकांत यांचं अभिनंदन केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button