मुख्यमंत्री ठाकरे यांचे चंद्रकांतदादांकडून अभिनंदन

सांगली : महाविकास आघाडी सरकारवर सडकून टिका करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवरून मु‘यमंत्री उध्दव ठाकरे यांचे िअभनंदनही केले. दोन भाऊ भांडून वेगळे राहिले म्हणून त्यांच्यातील भावनिक संबध संपत नाही. अशा भावनेतूनच ठाकरे यांनी मोदींची भेट घेतल्याचे ते म्हणाले.

मनसेने काढली वारिस पठाणची अंतयात्रा

मु‘यमंत्री उध्दव ठाकरे यांचा आत्मविश्वास वाढत आहे, पहिले काही महिने दचकत निर्णय घेणारे मु‘यमंत्री ठाकरे आता हळू हळू आपला निर्णय घेऊ लागले आहेत. त्यामुळे आता ठाकरे यांचे धाडस वाढत आहे. ही िअभनंदनिय बाब असल्याचे मत व्यक्त करतांना चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर टिका केली. ते म्हणाले, राममंदीराचा निर्णय सर्वोच न्यायालयाने दिलेला आहे. न्यायालयानेच राममंदीरासाठी ट्रस्ट करण्याचे आदेश दिलेले आहेत. मसिदीच्या बाबतीत तसे आदेश नाहीत. असे असताना पवार जे बोलतात, यावरुन पवारांचाच काय ?, विरोधकांचा घटनेवरच विश्वास नाही, असे दिसते. मंदीर पाडून मसिद बांधणारे बाबर पवारांना आपले वाटत असतील तर त्यांनी न्यायालयात दाद मागावी.

काकडेंच्या विधानावर दादांचे मौन

राज्यसभेच्या होणार्‍या निवडणूकीवरून काकडे यांनी माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या बाबत केलेल्या वक्तव्यावर भाष्य करणे चंद्रकांत पाटील यांनी टाळले, ते म्हणाले, काकडेंच्या वक्तव्यावर मी काही बोलणार नाही, प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे, मते मांडण्याचे सर्वांना िअधकार आहेत. भाजपमध्ये नावे केंद्रात निश्चित होतात. त्यामुळे राज्यसभेवर कोणाचे नाव द्यायचे, हे केंद्रात ठरेल.त्याचबरोबर राज्यसभेचे अजून नोटिफिकेशन निघायचे आहे. 8 एप्रिलला मुदत संपायची आहे. केंद्रातून कोणाचे नाव निश्चित होतेय हे पाहू.