व्याजदराचा निर्णय फिरवल्याबद्दल अभिनंदन; इंधन-गॅस दरवाढही मागे घ्या : सुप्रिया सुळे

Maharashtra Today

नवी दिल्ली : अल्प बचत योजनांवरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने काही तासात मागे घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण(Nirmala Sitharaman) यांचे आभार व्यक्त केले. सोबतच इंधन आणि गॅस दरवाढही मागे घ्या, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी केली.

‘अल्पबचतीवरील व्याजदरांमध्ये कपात करण्याचा निर्णय सरकारने तातडीने फिरविला. सरकारचे याबद्दल अभिनंदन. यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला.आता केंद्र सरकारने अशीच तत्परता पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाचा गॅस (fuel-gas price hike)यांवर लादलेली मोठी दरवाढदेखील तत्काळ मागे घ्यावी ही विनंती.” असे ट्वीट सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी केले आहे.

दरम्यान, वित्त मंत्रालयाच्या नजरचुकीचे अजिबात नवल वाटले नाही. पण वित्त मंत्रालय नेमक कोण चालवतय? आणि या मंत्रालयाने शेवटचा कोणता निर्णय विचारपूर्वक घेतला होता? नोटाबंदी, जीएसटीची अंमलबजावणी की कोरोना संदर्भातील आर्थिक पॅकेज? असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे.

अल्प बचत योजनांचे नवीन व्याजदर तीन महिन्यांनी सरकारकडून बदलले जातात. बर्‍याचदा जुने व्याज दरच कायम ठेवले जातात. यंदा व्याजदरामध्ये मोठा बदल करण्यात आला होता. २०२०-२१च्या आर्थिक वर्षातील शेवटची तिमाही संपल्यामुळे ३१ मार्चला नवीन व्याजदर जाहीर करण्यात आले, परंतु १ एप्रिलला हे दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय झाला.

 

ही बातमी पण वाचा : सरकारी अल्पबचत योजनांच्या व्याजातील कपात मागे; केंद्र सरकारचा दिलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button