लौकिक आणि परफॉर्मन्स कायम राखल्याबद्दल अभिनंदन; राहुल गांधींना भातखळकरांचा टोमणा

Atul Bhatkhalkar - Rahul Gandhi - Maharashtra Today
  • राहुल गांधी यांनी प्रचारसभा घेतलेल्या ठिकाणच्या उमेदवरांचे डिपॉझिट जप्त !

मुंबई : पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने बाजी मारली. काँग्रेस व डाव्या पक्षांचा पूर्ण सफाया झाला. विशेष म्हणजे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी प्रचारसभा घेतलेल्या सर्व ठिकाणच्या त्यांच्या उमेदवरांचे डिपॉझिटही जप्त झाले! यावरून भाजपाचे नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी राहुल गांधींना (Rahul Gandhi) टोमणा मारला – लौकिक आणि परफॉर्मन्स कायम राखल्याबद्दल अभिनंदन! भातखळकर यांनी ट्विट केले – “लौकिक आणि परफॉर्मन्स कायम राखल्याबद्दल राहुलजींचे अभिनंदन. पश्चिम बंगालमध्ये राहुल गांधींनी प्रचारसभा घेतलेल्या सर्व मतदारसंघांमधील काँग्रेस उमेदवारांचं डिपॉझिट जप्त.” पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्या आघाडीला फक्त एक जागा मिळाली.

तिसऱ्या आघाडीच्या ८५ टक्के उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. ज्या दोन मतदारासंघांसाठी राहुल गांधींनी प्रचारसभा घेतल्या त्या दोन्ही मतदारसंघांमध्येही काँग्रेसचा पराभव झाला आहे. तिसऱ्या आघाडीने सर्व २९२ जागा लढवल्या होत्या. या आघाडीतील सदस्य पक्ष असलेल्या ‘भारतीय धर्मनिरपेक्ष मोर्चा’ने काँग्रेस आणि डाव्या घटक पक्षांपेक्षा जास्त चांगली कामगिरी केली; त्याला किमान एक जागा मिळाली. काँग्रेस आणि डाव्या पक्षांना खातेही उघडता आले नाही!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button