नितीन गडकरींच्या दिल्लीतील घराबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी भिरकावली पोलिसांवर स्कूटर

delhi

नवी दिल्ली:- सुधारित मोटरवाहन कायद्याच्या अमलबजावणीच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील घराबाहेर निदर्शने केली. तसेच काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने स्कूटर उचलून पोलिसांच्या दिशेने भिरकावली. दिल्लीसोबतच गुजरात, राजस्थान, छत्तीसगड या राज्यांतही मोटर वाहन कायद्याच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे गुजरात सरकारने हा दंड कमी करण्याची घोषणा केली आहे. नवा मोटर वाहन कायदा 1 सप्टेंबरपासून लागू झाल्यानंतर वाहनचालकांना भुर्दंड बसला. गुरगावमध्ये एका दुचाकीस्वाराला 56 हजार रुपयांचा दंड बसला.

त्याचबरोबर एका ट्रकचालकालाही 41 हजार 700 रुपयांचा दंड झाला. या कायद्याला जोरदार विरोध झाल्यानंतर गुजरात सरकारने हा दंड कमी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय राज्य सरकार घेऊ शकत नाही, असे नितीन गडकरी यांनी म्हटले होते. गुजरातनंतर आता छत्तीसगड आणि राजस्थानमधूनही हा दंड कमी केल्याच्या बातम्या येत आहेत.