धनगर समाजाच्या आरक्षणासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचे आंदोलन

नागपूर : राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळून धनगर समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आज विधान भवनासमोर आंदोलन करून व्यक्त केली.

भाजपने सत्तेवर येण्याआधी आपल्या जाहीरनाम्यात धनगर समाजाला आरक्षण देऊ असं जाहीर केले होते.
धनगर समाजाने भाजपवर विश्वास ठेवून त्यांच्या बाजने मतदानही केले. पण सत्तेवर आल्यानंतर भाजपच्या सरकाने समाजचा विश्वासघात केल्याचा आरोप या आमदारांनी केला आहे.

नागपुरातील धनगर समाजाच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर आरक्षण मिळऊन देण्याची ग्वाही दिली होती. परंतु या सरकारला सत्तेवर येऊन 2 वर्षे झाली तरीही आमची मागणी पूर्ण करण्यात सरकार गंभीर नसल्याचा आरोप या आमदारांनी केला आहे.