शिवसेना – राष्ट्रवादीकडून आम्हाला वाईट वागणुक; कॉंग्रेस नेत्यांची सोनियांकडे तक्रार

नवी दिल्ली :- राज्यातील कॉंग्रेसचे (Congress) मोठे नेते सध्या दिल्लीत आहेत. राज्यातील राजकीय घडामोडी, सरकारमधील भूमिका अशा अनेक बाबींवर ते आपल्या नेत्या कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना अवगत करून देत नसतील तर नवलंच. याच पार्श्वभूमीवर आता असेही वृत्त आहे की, राज्यातील कॉंग्रेस नेत्यांनी शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीविरोदातही (NCP) सोनिया गांधी यांच्याकडे तक्रार केली आहे.

राज्यात पक्षाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रातील कॉंग्रेस मंत्र्यांनी शनिवारी नवी दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेतली. कॉंग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळात आघाडीचे भागीदार, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी त्यांना दिलेल्या ‘गैरवर्तन’ बद्दल तक्रारी केल्या.

तर, काही केंद्रीय नेत्यांनी कॉंग्रेसने अधिक मजबूत व्हावे अशी इच्छा असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच, प्रदेश कॉंग्रेस प्रमुखांच्या निवडणुकीच्या विषयावर मंत्र्यांनी चर्चा केली. विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे कॅबिनेट मंत्री आहेत. राज्य पातळीवर पक्षाला बळकटी मिळण्यासाठी कॉंग्रेसला नवीन प्रमुख निवडावे लागतील आणि या प्रक्रियेला गती द्यावी लागेल, असे त्यांना वाटते. दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले की, पक्ष मजबूत करण्यासाठी रणनीती ठरविण्यासाठीची ही बैठक होती.

तथापी असेही वृत्त आहे की, कॉग3ेस प्रदेशाध्यक्ष बदलण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी खोडा घालत असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

ही बातमी पण वाचा : कॉंग्रेस नेत्यांनी केली शिवसेनेची पक्षश्रेष्टींसमोर तक्रार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER