कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी घेतली मजुरांची मुलाखत

Rahul Gandhi Video

नवी दिल्ली : देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे . या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली . या कठीण काळात काँग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांनी हरयाणाहून झांसीकडे पायी निघालेल्या स्थलांतरित मजुरांचे दु:ख जाणून घेतले . यादरम्यान मजुरांशी केलेल्या चर्चेचा व्हिडिओ आज सकाळी ९ वाजता शेअर केला. या व्हिडिओत मजुरांनी आपल्याला येत असलेल्या अडचणी राहुल गांधी यांना सांगितल्या .

हे स्थलांतरित मजूर ७०० किमीचा प्रवास पायी करत आहेत. त्यांना गाठून राहुल गांधी यांनी अनेक प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची उत्तरे देत या मजुरांनी आपल्याला येत असलेल्या अडचणी सांगितल्या. त्यांच्याशी बोलताना, केंद्र सरकारने तर प्रत्येकाच्या बँक खात्यावर पैसे टाकलेले आहेत, ते आपल्याला मिळाले नाहीत का?, असा प्रश्न केला. मात्र, आम्हाला एक रुपयाही मिळालेला नसल्याचे मजुरांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER