निर्मला सीतारामन यांच्याबाबत काँग्रेसनेते चौधरी यांची आजही जीभ घसरली

नवी दिल्ली :- काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांची जीभ आज लोकसभेत बोलताना पुन्हा घसरली. सभागृहात कार्पोरेट टॅक्स कमी करण्याच्या चर्चेत सहभाग घेताना चौधरी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा उल्लेख ‘निर्बला’ सीतारामन असा केला. त्याला सत्ताधाऱ्यांनी जोरदार आक्षेप घेत संसदेत काहीकाळ गोंधळ घातला. चौधरी यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना काल एनआरसी मुद्यावरून घुसखोर संबोधले होते.

लोकसभेत कार्पोरेट टॅक्सबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सरकारची भूमिका मांडली. त्यावर काँग्रेसकडून काँग्रेसच्या संसदीय दलाचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी त्यावर भाष्य केले. मी तुमचा नेहमीच सन्मान करतो. तुमच्याबद्दल मला आदरही आहे. असे म्हणत चौधरी म्हणाले, कधी कधी तुमची केविलवाणी अवस्था पाहता येत नाही. त्यामुळे तुम्हाला निर्मला सीतारामन ऐवजी निर्बला सीतारामन म्हणणे योग्य ठरेल का? कारण तुम्ही मंत्री आहात आणि तुम्हाला जे करायचं आहे. ते तुम्ही कधीच करत नाही. असं का होतं मला माहीत नाही, असा टोला चौधरी यांनी लगावला. चौधरी यांच्या टीकेवर सत्ताधारी भाजप खासदारांनी जोरदार आक्षेप घेत सभागृहात गदारोळ केला.

सध्या अमेरिका आणि चीनमध्ये ट्रेड वॉर सुरू आहे. त्यामुळे चीनमधून मोठ्याप्रमाणावर कार्पोरेट आणि मल्टिनॅशनल कंपन्या बाहेर पडण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर या कंपन्या जवळचा देश म्हणून भारतात येऊ शकत असल्याने सरकारने कार्पोरेट टॅक्स कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सीतारामन यांनी म्हटले होते.

भाजप नेत्यांनीच पंकजा मुंडेचा गेम केला : विजय वडेट्टीवारांचा आरोप