मराठा आरक्षणाचा गोंधळ : निषेधात घरावर काळे झेंडे लावा; मराठा क्रांती मोर्चाचे आवाहन

Maharashtra Today

औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण (Maratha Resrvation)रद्द केल्यानंतर मराठा समाजाला दिलासा देणारा एकही निर्णय शासनाने घेतला नाही. राजकीय पक्षांचे परस्परांवर आरोप करणे सुरू आहे. या गोंधळाच्या निषेध करण्यासाठी घरांवर काळे झेंडे(black flags)लावा, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाने(Maratha Kranti Morcha) केले आहे.

मराठा क्रांती मोर्चाचे स्थानिक समन्वयक आणि याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्या उपस्थितीत राजकारण्यांचा निषेध करण्यासाठी बुधवारपासून घरावर काळे झेंडे लावण्यास सुरुवात झाली. विनोद पाटील यांनी काळे कपडे घालून स्वतःच्या घरावर काळा झेंडा लावला. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत समाजानेही घरावर काळे झेंडे लावून निषेधकरावा, असे आवाहन त्यांनी केले.

रावर काळे झेंडे लावून करत असलेला हा निषेध न्यायालयाविरोधात नाही. मराठा आरक्षणासाठी सरकारने अजूनही काही पर्यायी व्यवस्था केली नाही. कोरोनाच्या साथीमुळे आम्ही रस्त्यावर उतरणार नाही, असे विनोद पाटील म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button