अजित पवारांच्या ‘त्या’ विधानावरून महाविकास आघाडीत संभ्रम

Ajit Pawar

मुंबई : राज्यात पुन्हा ईव्हीएम (EVM) चा मुद्दा ऐरणीवर आला आहे, काँग्रेसने (Congress) अनेकदा ईव्हीएम मशिनवर आक्षेप आणि शंका उपस्थित केली होती. ईव्हीएम वरून बऱ्याचदा भाजपा आणि विरोधकांमध्ये वादंग निर्माण झाले होते. ईव्हीएम मध्ये फेरफार करून भाजपा निवडणुका जिंकते असा आरोप विरोधक करत असतात. काँग्रेस, राष्ट्रवादी (NCP) सगळ्यांनी ईव्हीएमला विरोध केला होता.

राज्यातील काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींमुळे महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) मंत्र्यांच्या खातेवाटपाच्या प्रश्नावर वावड्या उडविण्यात येत आहेत. मात्र, खातेवाटपाबद्दल आमच्यात थोडीशीच काय, तसूभरही चर्चा नाही. त्यामुळे तुमचे सोर्सेस काय आहेत, ते मला कळू शकणार नाही,’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी गुरुवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना लगावला. ‘ईव्हीएम’ मशीनबद्दलही त्यांनी आपले परखड मत मांडले.

स्थानिक स्वराज संस्था व राज्यातील निवडणुका मतदानपत्रिकेने घेण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी नव्या कायदा करण्याचे सूतोवाच तत्कालीन विधानसभा अध्यक्ष या नात्याने नाना पटोले यांनी केले होते. याकडे लक्ष वेधता ते आता एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. मुळात याबाबत अंतिम निर्णय राज्य मंत्रिमंडळाचा असतो. ईव्हीएम मशीन उत्तम असून, अचूक मतदानासाठी हीच मशीन चांगली आहे, अशा शब्दांत अजित पवार यांनी ठाम मत व्यक्त केले. शिवाय महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष बिनविरोध व्हावा यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER