वरिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांची वेतन निश्चिती; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Senior College Principals Salary

मुंबई :- राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयात (College) सरळ सेवेतून किंवा थेट नियुक्त झालेल्या प्राचार्यांची वेतन निश्चिती करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) होते.

या निर्णयानुसार १ जानेवारी २००६ रोजी किवा त्यानंतर प्राचार्य पदावर सरळसेवेने / थेट नियुक्त झालेल्या वरिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांची ६ व्या वेतन आयोगातील वेतनबॅण्ड रु ३४४०० – ६७००० व अकॅडमिक ग्रेड वेतन रु. १० हजार या वेतन संरचनेची रु. ४३ हजार इतक्या वेतनावर वेतन निश्चिती करण्यात आली. यासाठी ४२ कोटी ८९ लाख ९६ हजार ८७६ रुपयांच्या खर्चास आज मंजुरी देण्यात आली.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या व केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या तरतूदीनुसार प्राचार्य पदाची वेतननिश्चिती रु. ४३ हजार करण्याबाबत उच्च न्यायालयाचे आदेश होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

इतर निर्णय –

  • महाराष्ट्र आरोग्य सेवा गट-अ मधील पद्व्युत्तर पदविका व पदवी धारण करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहनपर वेतनवाढ – सार्वजनिक आरोग्य विभाग
  • राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील थेट नियुक्त प्राचार्यांच्या वेतन निश्चितीस मान्यता- उच्च व तंत्रशिक्षण
  • सर्व महसुली विभागांत अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा समप्रमाणात भरणार. सरळसेवा व पदोन्नतीने नियुक्तीसाठी महसुली विभाग वाटप नियम 2021 ही नवीन अधिसूचना काढणार- सामान्य प्रशासन
  • गौण खनिजावरील स्वामित्वधनाच्या व डेड रेंट दरात सुधारणा करण्याचा निर्णय- महसूल
  • सारथी संस्थेस शिवाजीनगर पुणे येथे शासकीय जागा – महसूल
  • पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालय संस्थेस पुणे जिल्ह्यातील चिखली येथे विस्तार केंद्रासाठी जागा- उच्च व तंत्रशिक्षण
  • रत्नागिरी येथे नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय. शिक्षक व कर्मचाऱ्यांची पदे भरण्यास मंजुरी- उच्च व तंत्रशिक्षण विभाग
  • अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील काटेपूर्णा बॅरेज प्रकल्पास सुधारित मान्यता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER