..तर राज्यात मध्यावधी निवडणुका निश्चित? चंद्रकांत पाटील यांचा दावा

Chandrakant Patil

मुंबई : शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शनिवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट त्यानंतर राज्यात मोठा भूकंप होण्याची चर्चा रंगली आहे. त्यातच आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मोठे विधान करून खळबळ माजवली आहे.

राज्यात सध्या मध्यावधी निवडणुकीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या (Corona) संकटकाळात राज्यात मध्यावधी निवडणुका व्हाव्या अशी कुठल्याही पक्षाची इच्छा नाही. एक निवडणूक लढणं, पक्षाला आणि उमेदवाराही अवघड असतं, अनिश्चितता राहते, शेवटी कोणाची तडजोड झाली नाही तर मध्यावधी निवडणुका होऊ शकतात. आगामी निवडणूक भाजपा स्वबळावर लढवेल असा दावा भाजपा (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

दरम्यान, आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी एक वक्तव्य केलं आहे. शिवसेना आमच्यासोबत आली नाही तर राष्ट्रवादीने भाजप-रिपाइंसोबत यावं. रिपाइं आधीही राष्ट्रवादीसोबत होती. त्यामुळे भाजप-राष्ट्रवादी आणि रिपाइं असं सरकार महाराष्ट्रात बनवू शकतो. पवारांना भविष्यात सत्तेत संधी मिळू शकते. शरद पवार यांच्यासारखा अनुभवी नेते एनडीएमध्ये आले तर नरेंद्र मोदींना त्यांची साथ मिळेल आणि देशाच्या विकासासाठी फायदा होईल, असा नवा फार्मुला आठवले यांनी राष्ट्रवादीसमोर ठेवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER