एच १ बी व्हिसा असणाऱ्यांना सशर्त अमेरिकेत येण्याची परवानगी

Donald Trump - H1B Visa

वॉशिंग्टन : अमेरिकेने एच १ बी (H1B Visa) आणि एल १ व्हिसा संदर्भात काही निर्बंध शिथिल केल्याने अमेरिकेत काम करत असलेल्या आयटी आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ट्रम्प प्रशासनाने याबाबतची घोषणा केली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी एच १ व्हिसा नियमांत बदल केले आहेत. ज्या लोकांकडे एच १ बी व्हिसा आहे त्यांना सशर्त अमेरिकेत येण्याची परवानगी देण्यात आली आहे. अमेरिकेवर एच १ बी व्हिसावर राहणाऱ्या लोकांच्यात भारतीयांचं प्रमाण सर्वाधिक आहे.

एच १ बी या व्हिसाच्या आधारावर दुसऱ्या देशातल्या नागरिकांना अमेरिकेत जास्तीत जास्त सहा वर्षं राहून नोकरी करता येते. या व्हिसामुळे अमेरिकेचे नागरिकत्व मिळवण्याचा मार्ग सोपा होतो. व्हिसा मिळाल्यानंतर पाच वर्षांनी परदेशी नागरिकाला सरळ अमेरिकेच्या ग्रीन कार्डसाठी अर्ज करता येतो. अमेरिकेत या व्हिसाची मागणी इतकी जास्त आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER