शेतकऱ्यांच्या ‘ट्रॅक्‍टर परेड’ला सशर्त परवानगी

Conditional permission for farmers tractor parade

नवी दिल्ली : दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्‍टर परेडला पोलिसांची परवानगी मिळाली आहे. प्रजासत्ताक दिनाला राजपथावर सैन्याची परेड तर दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांची ट्रॅक्टर परेड होणार आहे. सिंघू बॉर्डर, टिकरी बॉर्डर, गाजीपुर बॉर्डर व शहाजापूर बॉर्डर येथून ट्रॅक्टर्स दिल्लीमध्ये येणार आहेत. शेतकऱ्यांना आउटर रिंग रोडवर एकत्रित मोर्चा करायचा होता, मात्र त्याऐवजी दिल्लीतल्या अंतर्गत रस्त्यांवर मर्यादित प्रवेशाला परवानगी देण्यात आली आहे. सर्व सीमांवरचे ट्रॅक्टर एकत्रित येणार नाहीत तर जिथपर्यंत परवानगी दिली आहे तिथून ते आपापल्या ठिकाणी परत माघारी जाणार आहेत.

शेतकरी दिल्लीत येतील आणि शांततेत मोर्चा काढतील, असे शेतकरी नेते म्हणाले. उद्या परेडचा मार्ग निश्चित होईल. शनिवारी शेतकरी नेते व पोलिस यांच्यात बैठक झाली. बैठकीनंतर स्वराज इंडियाचे योगेंद्र यादव म्हणाले की, २६ जानेवारी रोजी शेतकरी या देशात प्रथमच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी परेड करणार आहे. पाच टप्प्यांच्या चर्चेनंतर या सर्व गोष्टींना मंजुरी देण्यात आली आहे. सर्व बॅरिकेड्स उघडतील, दिल्लीत जाऊन आम्ही परेड काढणार आहोत. मार्ग कोणता असेल याबाबत जवळपास सहमती झाली आहे. परेड दरम्यान शांतता राखण्याचे आवाहन शेतकरी नेत्यांनी केले आहे. परेडची वेळ अद्याप निश्चित झाली नाही मात्र, परेड २४ ते ७२ तास चालू शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER