कोरोनाची स्थिती चिंताजनक : राज्यात आज आढळलेत नवे १७ हजार ८६४ रुग्ण, ८७ चा मृत्यू

Maharashtra Coronavirus

मुंबई : राज्यात कोरोना (Corona) संसर्ग रोज वाढतो आहे. रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होते आहे. आज १७ हजार ८६४ वने रुग्ण आढळलेत. ८७ रूग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यात एकूण १,३८,८१३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

हि गंभीर स्थिती लक्षात घेऊन सरकारकडून निर्बंध अधिक कडक केले जात आहे. अनेक शहरांमध्ये लॉकडाउन देखील सुरू करण्यात आला आहे. आज राज्यात ८७ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील रुग्णांचा मृत्यूदर २.२६ टक्के आहे.

आज ९ हजार ५१० रुग्ण बरे झालेत. राज्यात आजपर्यंत एकूण २१,५४,२५३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९१.७७ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७७,१५,५२२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २३,४७,३२८ (१३.२५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,५२,५३१ व्यक्ती गृह आणि ६ हजार ६७ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणामध्ये आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER