वीज बिलात सवलत : तीन दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मंत्रालयात घुसून आंदोलन – भाजपाचा इशारा

Atul Bhatkhalkar - CM Uddhav Thackeray

मुंबई : ढिसाळ कारभारामुळे राज्यातील वीज ग्राहकांना भरमसाठ वीज बिल पाठवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi) तीन दिवसांत वीज बिलांच्या सवलतीबाबत निर्णय घेतला नाही तर मंत्रालयात घुसून आंदोलन करू, असा इशारा भाजपाचे (BJP) मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी सरकारला दिला.

वाढीव वीज बिलांच्या निषेधात भारतीय जनता पार्टीने आज मुंबई येथील महावितरणच्या ‘प्रकाशगड’ कार्यालयावर काढलेल्या मोर्च्याला संबोधित करताना आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षांमध्ये असलेला बेबनाव पुराव्यानिशी सर्वांसमोर मांडला. ऊर्जामंत्र्यांनी वाढीव वीज बिलात सवलत देण्याचे वारंवार आश्वासन दिले. परंतु ऊर्जा खाते काँग्रेस पक्षाकडे असल्यामुळे वीज बिलांत सवलत देण्यासाठी आवश्यक असणारा निधी देण्यास मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांनी नकार दिला आहे. श्रेयवादाच्या लढाईत राज्यातील जनतेला वेठीस धरण्याचे दुष्पाप हे महाविकास आघाडी सरकार करत आहे. जोपर्यंत राज्यातील जनतेला ३०० युनिटपर्यंतची सवलत व वाढीव वीज बिलातून दिलासा मिळणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्षाचे आंदोलन सुरू राहील, असे भातखळकर म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER