वीज बिलात सवलत : प्रस्ताव एका मंत्र्याने दाबून ठेवला! आंबेडकरांचा आरोप

राज्य कोण चालवते? मुख्यमंत्र्यांना विचारले

Prakash Ambedkar

अकोला : राज्यात ५० टक्के वीज बिल माफ होऊ शकते, असा प्रस्ताव वीज कंपन्यांनी दिला होता; पण हा प्रस्ताव राज्याच्या एका मंत्र्याने दाबून ठेवला, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे.

आंबेडकर यांनी यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना टोमणा मारला – राज्याचा कारभार मुख्यमंत्री चालवत आहेत की एखादा मंत्री? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे.

वीज बिल माफीच्या मुद्यावरून राज्यात चांगलंच राजकारण तापलं आहे. वीज वापरली असेल तर त्याचं बिल भरावंच लागेल, ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांच्या या विधानानंतर सर्व विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. वीज बिलात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय कोणत्या मंत्र्याने रद्द केला? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी याआधी नांदेड येथील पत्रकार परिषेदत उपस्थित केला होता. सोबतच वीज बिल भरू नका, असे आवाहनही त्यांनी केले होते.

वीज कापल्यास वीज जोडणीची जबाबदारी घेणार वंचित
वीज बिल माफ केले नाही तर कुणीही वीज बिल भरू नका. ज्यांची वीज कापली जाईल त्यांची वीज जोडून देण्याची जबाबदारी वंचित घेईल, अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER