‘गोमांस आणि दारु’ची चिंता करणारे ‘पवार-ठाकरे’ महाराष्ट्रासाठी ग्रहणच – आचार्य तुषार भोसले

Acharya Tushar Bhosale

मुंबई :- भाजप-शिवसेना (BJP-SHIVSENA) युतीच्या काळात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये लागू करण्यात आलेली दारूबंदी अखेर महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi) उठवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. मात्र या निर्णयाचा अनेक स्तरावरुन विरोध केला जात आहे. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीकडूनही या निर्णयाचा विरोध करण्यात आला आहे. आघाडीचे नेते आचार्य तुषार भोसले (Acharya Tushar Bhosale) यांनी ट्विट करत थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (CM Uddhav Thackeray) निशाणा साधला.

बार धार्जिणे शरद पवार लक्षद्वीप मधे गोमांसावर बंदी येऊ नये यासाठी प्रयत्न करतात तरमुख्यमंत्री उद्धव ठाकरे चंद्रपुरातील दारूबंदी उठवतात. ‘गोमांस आणि दारु’ ही प्राथमिकता असलेले ‘पवार-ठाकरे’ हे साधु-संतांच्या महाराष्ट्राला लागलेलं ग्रहणच आहे. देवा, माझ्या महाराष्ट्राला लवकर मुक्त कर, असे म्हणत आचार्य तुषार भोसलेंनी निशाणा साधला.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button