पोलिस दलात चिंता : कोरोना मृत्यूचा आकडा दोनशेपार

Maharashtra Police - Coronavirus Death

मुंबई : राज्यातील कोरोनाग्रस्त (Corona) पोलिसांचा (Police) आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात 370 पोलिसांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. राज्यातील कोरोनाग्रस्त पोलिसांचा आकडा 19 हजार 756 वर पोहोचला आहे. यात 2 हजार 142 अधिकारी आणि 17 हजार 614 अंमलदारांचा समावेश आहे.

गेल्या चोवीस तासांत मुंबई आणि रत्नागिरी पोलीस दलातील दोन अधिकाऱ्यांसह 6 अंमलदारांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्या पोलिसांचा आकडा 202 वर पोहोचला आहे. दोन अधिकाऱ्यांसह सहा अंमलदारांच्या मृत्यूने पोलीस दल पुन्हा एकदा हादरले. मुंबई आणि रत्नागिरी पोलीस दलातील दोन अधिकारी, तर ठाणे शहर, नाशिक शहर, सांगली, जळगाव, नंदुरबार आणि उस्मानाबाद पोलीस दलातील सहा अंमलदार अशा एकूण आठ जणांना आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. पोलीस मृतांची संख्या 202 झाली असून यात 20 अधिकारी आणि 182 अंमलदारांचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER