दोन हजार लोकांना तपासणी अनिवार्य अन्यथा होणार फौजदारी

Corona Health Checkup

कोल्हापूर :- पुणे मुंबई आदी रेड झोन मधून कोल्हापुरात आलेल्या सुमारे दोन हजार नागरिकांना आरोग्य तपासणी करावी, अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत. बाहेरून आलेल्या या व्यक्तींना मोबाईलवर मेसेजद्वारे याबाबत कळविण्यात आले आहे.

जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या नागरिकांची तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र, काही नागरिक थेट घरी जाऊन वेळ मिळेल तेव्हा तपासणीसाठी रुग्णालयात जात असल्याचे समोर आले आहे. यामुळे सामूहिक संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने तपासणी न करणाऱ्या नागरिकांवर फौजदारी कारवाई सुरू केले आहे. गेल्या दोन दिवसांत तपासणी न केलेल्या 2081 नागरिकांना तसे मोबाईलवर संदेश पाठवण्यात आले आहे.

अन्य जिल्ह्यातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नागरिक येत आहेत. यापैकी सर्वाधिक लोक रेड झोन असलेल्या जिल्ह्यामधून येत आहेत. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रेड झोनमधून आलेल्या नागरिकांना तपासणी बंधनकारक आहे. जिल्ह्यात प्रवेश करताना तपासणी नाक्यावरच संबंधित नागरिकाला कोणत्या दवाखान्यात तपासणी करून घ्यायची, याबाबतची स्लिपच दिली जाते. ही स्लिप घेऊन संबंधितांना रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी लागते.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून अनेक जण तपासणी करण्यापूर्वीच घरी जात आहेत. सर्वत्र फिरत आहेत आणि वेळ मिळाल्यानंतर रुग्णालयात जाऊन तपासणी करून घेत आहेत. ही वस्तुस्थिती समोर आल्याने जिल्हा प्रशासनाने तपासणी न करता घरी जाणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER