पुणे स्मार्ट सिटी’ची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा ; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सुचना

Ajit Pawar

पुणे : कोरोनाच्या (Corona) काळात पुणे स्मार्ट शहराची कामं लांबणीवर पडली आहेत. मात्र, आता अनलॉक प्रक3िया सुरू झाल्यानंतर या कामांना गती देण्यात आली आहे. याबाबतची स्मार्टसिटी ॲडव्हायझरी फोरम’ची चौथी बैठक आज संपन्न झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अधिका-यांना काही सुचना केल्या आहेत.

पुणे ‘स्मार्टसिटी’ अंतर्गत होणारी कामे दर्जेदार तसेच मुदतीत पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी. लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन त्यानुसार अंमलबजावणी करावी. याबरोबरच पुणे ‘स्मार्ट सिटी’चे रँकिंग राष्ट्रीय पातळीवर कसे सुधारेल यासाठीही आपला प्रयत्न असला पाहिजे, असे अजित पवार यांनी अधिका-यांना सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की , स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीचे योग्य प्रकारे नियोजन करावे. स्मार्टसिटी अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या सर्व प्रकल्पांची कामे दर्जेदार होण्याकडे लक्ष द्यावे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरु करण्यात आलेली ‘कमांड कंट्रोल रुम’ अधिक चांगल्या प्रकारे कार्यान्वित करण्यासाठी विशेष लक्ष द्यावे. ‘कोरोना’ संकटाचा सामना करत असताना स्मार्टसिटी अंतर्गत सुरु असणाऱ्या सर्व प्रकल्पांची कामे मुदतीत पूर्ण करावीत. देशपातळीवर पुणे स्मार्ट सिटीचे रँकींग सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच्या समिती सभागृहात आयोजित बैठकीला व्हिसीद्वारे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, आमदार चेतन तुपे, आमदार सुनिल टिंगरे, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्त रुबल अगरवाल यांच्यासह पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER