
मुंबई : ज्या कोळीवाड्याच्या सीमांकनाचे काम( Koliwada work) अद्यापही झालेले नाही. त्याबाबत स्थानिक कोळी बांधवांना विश्वासात घेऊन ते काम तातडीने पूर्ण करावे, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिले.
मुंबईतील उर्वरित २९ कोळीवाड्यांचे सीमांकनाच्या कामाबाबत विधानभवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले. मुंबईतील उर्वरित २९ कोळीवाड्यांचे सीमांकनाच्या कामाला चालना देण्यासाठी महसूल, नगरविकास, मत्स्य व्यवसाय विभाग यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल, असेही श्री. पटोले यांनी सांगितले.
मुंबईमध्ये एकूण ४१ कोळीवाडे असून मुंबई शहरमध्ये १२ मुंबई उपनगरात २९ कोळीवाडे आहेत. यापैकी काही कोळीवाड्याचे सीमांकन झालेले नाही. या कोळीवाड्याचे सीमांकन कोळी बांधवांना विश्वासात घेऊन तातडीने पूर्ण करावे, असे निर्देश श्री. पटोले यांनी दिले.
सायन कोळीवाड्याच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे. इतर कोळीवाड्याच्या सीमांकनाबाबत संरक्षण देण्यात यावे किंवा नवीन बांधकामसाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी कोळी बांधवाच्या वतीने करण्यात आली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला