राष्ट्रीय महामार्गाचे उर्वरित कामे तत्काळ पूर्ण करा : आमदार चौगुले

MLA Chowgule

उस्मानाबाद : राष्ट्रीय महामार्ग (National Highway) चौपदरीकराणाचे काम सुरू आहे. काही ठिकाणी हे काम अर्धवट आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहेत. येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना आमदार ज्ञानराज चौगुले (Gyanraj Chowgule) यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

रस्ते चौपदरीकरणादरम्यान सुरक्षा विषयक उपाययोजना केल्या नाहीत, यामुळे अपघात वाढत आहे. आमदार चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली, या बैठकीत त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना उर्वरित कामे तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. यात त्यांनी आवश्यक ठिकाणी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी व नागरिकांसाठी भुयारी मार्ग, पादचारी उड्डाणपूल, सुरक्षा युक्त वळण रस्ते, पथदिव्यासह सर्व्हिस रोड, स्ट्रीट लाईट बसवणे, रॅम्प बसवणे, सुरक्षायुक्त चौक बसवणे, कोरेगांव रोडवरील उड्डाणपुलाखालील ड्रेनेज व्यवस्था सुरळीत करणे आदी बाबीवर चर्चा केली.

महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे आहे, एकाही उड्डाणपुलाचे काम पूर्ण नाही. महामार्गालगत ड्रेनेज व्यवस्था नसल्याने शेतकरी व ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे चौगुलेंनी येत्या महिनाभरात उर्वरित कामे पूर्ण करण्याची सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. उर्वरित कामासाठी निधीची तरतूद होणे, भूसंपादन प्रक्रियेतील उर्वरित निधी संबंधित शेतकरी, जागा मालकांना त्वरित मिळवून देणे आदींबाबत एका संयुक्त शिष्टमंडळाद्वारे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी भेट घेण्याचा ठराव बैठकीत घेण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER