खडसेंबाबतच्या तक्रारी : ईडी घेणार अंजली दमानियांकडून माहिती

Eknath Khadse Anjali

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या चौकशीपूर्वी सक्तवसुली संचालनालय  (ईडी) माहितीची जमवाजमव करते आहे. या संदर्भात ईडीचे अधिकारी हे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची भेट घेणार आहेत. अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसे यांच्यावर भ्रष्टाचार आणि मानहानीकारक शेरेबाजी केल्याचा आरोप केले आहेत. (ED officials will meet Anjali Damania before NCP leader Eknath Khadse’s probe) एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशावेळी अंजली दमानिया यांनी, माझ्याकडे एकनाथ खडसे यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे असल्याचा दावा केला होता.

आता दमानिया ईडीच्या अधिकाऱ्यांना काय माहिती देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुपारी ३ वाजता ईडीचे अधिकारी अंजली दमानिया यांना भेटणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत व त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताना वापरलेली भाषा यामुळे त्यांची राज्यपालनियुक्त सदस्य म्हणून विधानपरिषदेवर नियुक्ती करू नये, यासाठी दमानिया यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहिले होते.

ईडीच्या अधिकाऱ्यांचा खडसेंच्या वकिलांना फोन

एकनाथ खडसेंच्या (Eknath Khadse) केसप्रकरणी चौकशी करण्यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांनी अ‌ॅड. असीम सरोदे (Asim Sarode) यांना फोन केल्याची चर्चा आहे. ईडीचे अधिकारी थोड्याच वेळात सरोदे यांच्या कार्यालयात पोहचणार आहेत. अ‌ॅड. असीम सरोदे हे खडसेंचे वकील आहेत. त्यांच्याकडून दोन हजार पानांची माहिती ईडीला दिली जाण्याची शक्यता आहे. एकनाथ खडसे यांना ईडीकडून भोसरी जमीन प्रकरणी ३० डिसेंबरला ईडीसमोर हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. मात्र, एकनाथ खडसेंना कोरोना झाल्यामुळे ते ईडीसमोर हजर राहिले नव्हते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER