जम्बो हॉस्पिटलबाबतच्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत – अजित पवार

Ajit Pawar

पुणे :  पुण्यात कोरोनाची (Corona) स्थिती दिवसेंदिवस गंभार होत चालली आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पत्रकाराला पुण्यात वेलेत सुविधा न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला हे प्रकरण राज्यात चांगलेच तापले. त्यानंतर पुण्यातील आरोग्य व्यवस्थेवर प्रस्न निर्माण होऊन पुण्याच्या जम्बो हॉस्पीटलमधील (Jumbo Hospital) असुविधेवर प्रश्न उपस्तित झालेत.

त्यानंतर अपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अधिका-यांना कडक सुचना केल्या आहेत. जम्बो हॉस्पिटलबाबत नागरिकांची विश्वासार्हता वाढविण्यासाठी येथील परिस्थिती व व्यवस्थापन सुरळीत असणे आवश्यक आहे. जम्बो हॉस्पिटलबाबतच्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे कडक निर्देश अजित पवार यांनी अधिका-यांना दिले आहेत.

तसेच, येथील बेडच्या उपलब्धतेची माहिती पोहोचवण्यात व उपचारात हलगर्जीपणा झाल्यास दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे स्‍पष्‍ट निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

पवार म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रातून पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी कोरोना बाधित रुग्ण दाखल होत आहेत. कोरोनाच्या रुग्णांना वेळेत व योग्य ते वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी शासकीय यंत्रणेने पूर्ण ताकदीनिशी काम करावे. कोरोना परिस्थिती नियंत्रणासाठी राज्य शासन सर्व प्रकारे मदत करत असून दोन्ही महापालिकेच्या आरोग्य विभागाने देखील सक्रियपणे काम करावे असे निर्देश अजित पवार यांनी दिले.

पुण्यातील विधानभवन सभागृहात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थितीबाबत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER