कोल्हापूर जिल्हा परिषदेत शिवसेना-काँग्रेस समोरासमोर, ‘मातोश्री’कडे तक्रार

Maharashtra Today

कोल्हापूर : शिवसेनेच्या जिल्हापरिषदेतील पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यावरून कोल्हापूर जिल्हापरिषदेतील काँग्रेस आणि शिवसेनेतील संबंध ताणले गेले आहेत. पदाधिकारी बदलासाठी राजीनामा द्यायला तयार नसलेल्या शिवसेनेच्या बांधकाम सभापीतींची कामे काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांनी रोखली आहेत. या वादाची तक्रार ‘मातोश्री’ पोहचली(Shiv Sena-Congress in Kolhapur Zilla Parishad) आहे.

या घडामोडींमुळे जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाला वेगळं वळण लागले आहे. पदाधिकारी बदलासाठी राजीनामा द्यायला तयार नसलेल्या शिवेसनेचे बांधकाम सभापती हंबीरराव पाटील यांनी मंजूर केलेली एक कोटींची कामे जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील यांनी रोखली आहेत. ही कामे रोखण्यासाठी बजरंग पाटील(Bajrang patil) यांनी कार्यकारी अभियंत्यांना पत्र दिले आहे.

वाद मातोश्री दरबारी

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केल्यानंतर कोल्हापूर जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीने सत्ता मिळवली आहे. मात्र, पदाधिकारी बदलाची वेळ आल्याने शिवसेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास चालढकल सुरू केली. त्यामुळे काँग्रेसने संताप व्यक्त केला. यावरून जिल्हा परिषदेतील महाविकास आघाडीतील संबंध ताणले गेले आहेत. शिवसेनेच्या या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा म्हणून काँग्रेसने मातोश्रीवरून दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मातोश्रीतून काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button