मुंडेंवर आरोप करणा-या महिलेने आतापर्यंत चार मोठ्या पदाच्या लोकांना ब्लॅकमेल केले ? पोलिसात चौथी तक्रार

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी रेणु शर्मा (Renu Sharma) नावाची गायीका महिलेविराधात आतापर्यंत चार तक्रारी पोलिसात दाखल झालेल्या आहेत.

म्हणजेच रेणु शर्माने आतापर्यंत चार मोठ्या पदाच्या लोकांना ब्लॅकमेल केले आहे का असा प्रश्न येत आहे. मुंडे यांच्याविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेविरुद्ध आता चौथी तक्रार नोंदवण्यात आली आहे. कृष्णा हेगडे, मनिष धुरी यांच्यानंतर जेट एअरवेजचे अधिकारी रिझवान कुरेशी यांनीही तिच्याविरुद्ध तक्रार केली आहे.

या महिलेने आपल्याला ब्लॅकमेल केलं असा आरोप त्यांनी केला आहे. त्यांची तक्रार त्यांनी अंबोली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

तर या महिलेचे वकील रमेश त्रिपाठी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. वाशीच्या एपीएमसी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक असणाऱ्या महिला वकिलाचा विनयभंग केल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे.

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावामध्ये बीबीसी मराठीने हे वृत्त दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER