कर्नाटकातील मंत्र्या विरोधात युवतीची लैंगिक छळ केल्याची तक्रार

Ramesh Jarkiholi

बंगळूर : कर्नाटक राज्याचे पाटबंधारे मंत्री आणि बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका युवतीचा लैंगिक छळ केल्याची तक्रार बंगळूर पोलिसांत करण्यात आली आहे. लैंगिक छळाची एक चित्रफितही (सीडी) पुरावा म्हणून सादर करण्यात आली आहे. सदर सीडी मंगळवारी सायंकाळी वृत्तवाहिन्या आणि समाजमाध्यमांमध्ये व्हायरल करण्यात आली.

लैंगिक छळाची तक्रार माहिती हक्क कार्यकर्ते दिनेश कलहळ्ळी यांनी केली असून, ती युवतीही उत्तर कर्नाटकातीलच आहे, असे तक्रारीत म्हणण्यात आले आहे. शिवाय युवतीच्या पालकांना धमकी देण्यात आल्याचाही आरोप आहे. केपीटीसीएलमध्ये नोकरी लावतो, असे सांगून या तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करत सीडीची एक प्रत बंगळूर आयुक्तांकडे सुपूर्द करण्यात आली आहे. बंगळूरचे पोलिस उपायुक्त अनुचेत तपास करत आहेत. राज्याचे राजकारण उलथवून टाकणारा राजकारणी म्हणून रमेश जारकीहोळी (Ramesh Jarkiholi) यांचा चांगलाच दबदबा आहे. त्यामुळे या सीडी प्रकरणाने राज्यभरात वावटळ उठले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER